जळगावनिवडणूकराजकीय

एकनाथराव खडसे यांचा विधानपरिषद निवडणूकीत शानदार विजय,मंत्रिपद मिळण्याची शक्यता ? जळगाव जिल्ह्यात समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह

एकनाथराव खडसे यांचा विधानपरिषद निवडणूकीत शानदार विजय, मंत्रिपद मिळण्याची शक्यता ? जळगाव जिल्ह्यात समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत 27 मते मिळवून शानदार विजय मिळवलेला असून आता त्यांनी विधीमंडळाच्या वरीष्ठ सभागृहात प्रवेश केलेला आहे. या विजयामुळे खान्देशासह जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारलेला असून प्रचंड जल्लोष करण्यात येत आहे. यासोबतच त्यांचे सहकारी राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांचाही विजय झालेला आहे.
एकनाथराव खडसेंना मंत्रीपद मिळणार ?
या विजयामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या राज्यासह जळगाव जिल्ह्यातील समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून आता खडसेंना राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागलं आहे. एकनाथराव खडसे यांना राज्यमंत्री मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रीपदाची संधी मिळाल्यास जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांनाच्या सरकारमध्ये महसूलमंत्री पदावर असताना त्यांच्यावर विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आणी भूखंड खरेदी घोटाळ्याचे आरोप झालेले होते. त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.त्यानंतर ईडीच्या चौकशीचा ससेमिरा खडसेंच्या मागे लागला होता. मधल्या कालखंडात खडसे शांत होते.परंतु या सर्व आरोपांच्या चौकशीला सामोरे जात त्यातून क्लिनचिट मिळाल्यानंतर आता खडसे पुन्हा एकदा जोमाने विधान परीषद निवडणूकीच्या हायव्होल्टेज रणांगणात उतरलेले होते. ही निवडणूक खडसेंसाठी सोपी नव्हतीच !! भाजप नेते फडणवीस यांनी खडसेंच्या पराभवासाठी विशेष रणनीती आखल्याचे बोलले जात होते. तरीही या सर्व रणनीतीला फोल ठरवत मैदानात उतरून खडसेंनी विजय मिळवलेला आहे.

राजकीय समीकरणे बदलणार ?

शिवसेना नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणी भाजप नेते गिरीष महाजन यांना टक्कर देणारा दमदार अनुभवी नेता राष्ट्रवादीला हवा होता.खडसे ही उणीव भरून काढू शकतात,अशी आशा पक्षश्रेष्ठींना आहे. म्हणून येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खडसेंचा खूप मोठा प्रभाव दिसण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादीला जळगाव जिल्ह्यात आणखी मजबूत करण्यासाठी खडसेंना मंत्रीपद मिळण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात आता दोन आमदार

तसेच खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यात आता दोन आमदार झालेले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या कन्या ॲड.सौ.रोहिणी खडसे यांच्याशी चुरशीच्या झालेल्या लढतीत निसटता विजय मिळविलेला होता. आता मुक्ताईनगरात या दोन आमदार द्वयींमध्ये जोरदार राजकीय संघर्ष बघावयास मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे.तसेच खडसे हे हल्लीच्या विधान परीषदेवर प्रतिनिधित्व करणारे जळगाव जिल्ह्यातील दुसरे आमदार ठरणार आहेत.यापूर्वी जळगाव शहरातील भाजपचे

दोन मते बाद झाल्याने निकालाची धाकधूक

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज विधानभवन येथे पहिले मतदान हरिभाऊ बागडे यांनी केले. दुपारी ४.०० वाजेपर्यंत एकूण २८५ सदस्यांनी मतदान केल्याचे मतदान अधिकारी यांनी जाहीर केले.मात्र मतमोजणी करताना राष्ट्रवादीचे एक आणी भाजपचे एक अशी दोन मते मतपत्रिकेवरील खाडाखोडीमुळे बाद झालेली होती. ही दोन नेमकी कोणाचा पराभव करणार याबाबत मविआ व भाजप दोघांमध्ये धाकधुकी होती.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.