राजकीय
एकनाथराव खडसे यांच्या इनोव्हा गाडीचे टायर फुटले

धरणगाव- अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगाव कडे प्रस्थान करीत असताना धरणगाव जवळ रस्त्याने राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या इनोव्हा गाडीचा मागील टायर फुटल्याने चालकाने तात्काळ प्रसंगावधान राखून गाडीवर नियंत्रण राखल्याने एकनाथराव खडसे हे बालंबाल बचावले. यावेळी त्यांच्या गाडीत त्यांच्यासोबत चार आणखी व्यक्ती सुद्धा होत्या अशी माहिती मिळाली आहे. परंतु हे सर्व सुखरूप असल्याची माहिती मिळालेली आहे.