जळगावनिवडणूकमुंबईराजकीय

एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता ?

Eknath shinde | एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी वेगळा गट निर्माण करून झालेल्या सत्तासंघर्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याला आता मोठ्या घडामोडीनंतर पूर्णविराम मिळालेला आहे. आता उद्या विधानसभा अध्यक्ष पदाची निवड असल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलेले आहे. एकीकडे शिवसेनेचा पक्षादेश हा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना बंधनकारक असल्याचे शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. त्यातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे.

एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा

एकीकडे एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेची उमेदवारी देत आमदार म्हणून निवडून आणलेलं आहे.
एकनाथ खडसे विधानपरिषदेत आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. परंतु सध्याच्या बदललेल्या सत्तांतरामुळे ते आता मंत्री होऊ शकणार नाही, अशी राजकीय परिस्थिती असली तरी विधानपरिषदेत एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एका बाजूकडून एकनाथ खडसेंचा लालदिवा गेला असला तरी दुसऱ्या बाजूने त्यांना विधानसभेचा दीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांना विरोधी पक्षनेता हे महत्त्वाचे पद मिळू शकते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या नावाची चाचपणी करीत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.