ठाणेनिवडणूकमुंबईराजकीयराष्ट्रीय

एकनाथ शिंदेंच्या “या” नव्या ट्विटने पुन्हा खळबळ, शिवसेनेची बंडखोरांना हाक “या चिमण्यांनो परत फिरारे”

एकनाथ शिंदेंच्या “या” नव्या ट्विटने पुन्हा खळबळ, शिवसेनेची बंडखोरांना हाक “या चिमण्यांनो परत फिरारे”

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आता थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलेल असून, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे ट्विट करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलेली दिली.


आज शिवसेनेकडून सर्व बंडखोर आमदारांना इमेलद्वारे पत्र पाठवून शेवटचा गंभीर इशारा दिलेला आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईत या अन्यथा तुमच्यावर कारवाई अटळ असा गर्भीत इशारा या आमदारांना देण्यात आलेला आहे. यासंदर्भातील परिपत्रक दुपारी शिवसेनेकडून संबधित आमदारांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन आव्हान दिलेलं आहे.
या चिमण्यांनो परत फिरारे”
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच, शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना शेवटचा इशारा दिला आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईत या अन्यथा कारवाई अटळ असा इशारा या आमदारांना देण्यात आला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.