
एकनाथ शिंदे आणी राज ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा,मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी आणि जवळपास 50 आमदार घेऊन गुवाहाटीला गेलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात सध्या जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार अल्पमतात आलेले असून कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यात आज फोनवरून चर्चा झालेली आहे. राज ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल असताना फोनवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. मात्र सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील फोन वरील चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे.
दोघांमध्ये सध्याच्या सत्तासंघर्षातील राजकीय पेचावर चर्चा झाली का ? याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. पण राज ठाकरे यांची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना फोन केला होता.अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेली आहे.पक्षांतर विलगीकरण कायद्यांतर्गत तरतुदींमुळे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याचे घटनातज्ज्ञांचे मत असून शिंदे गटाला अपात्रतेपासून वाचण्यासाठी आणी सत्तास्थापनेसाठी भाजप किंवा प्रहार या पक्षांमध्ये विलीन व्हावे लागेल अस अनेक कायदेतज्ज्ञांच मत आहे.त्यामुळे ठाकरे ब्रॅंड म्हणून विलनीकरणासाठी मनसेचाही पर्याय असल्याचे बोलले जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांच्यावर लिलावती रूग्णालयात हिप बोनची (Hip bone) शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. त्यापूर्वी कोरोनाचा डेड सेल आढळून आल्याने ठाकरेंची शस्त्रक्रिया लांबणीवर पडली होती. अखेर लिलावती रुग्णालयात आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही महिने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे.
एकनाथ शिंदे हे तब्बल 50 पेक्षा जास्त आमदार फोडून गुवाहाटी येथे गेल्याने देशात सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत. इतकंच नाही तर इतर देशांमधून ही एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गुगलवर सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे.