रेल्वे संबंधी

एक देश एक मानक अभियानांतर्गत “RDSO” ही भारतीय मानक संस्थेची पहिली SDO संस्था म्हणून घोषीत

नवीदिल्ली (वृत्तसंस्था PIB) -ग्राहक व्यवहार विभागा अंतर्गत येणाऱी, भारतीय रेल्वेची आरडीएसओ (संशोधन रचना आणि मानक संघटना) ही संस्था एक देश एक मानक अभियाना अंतर्गत भारतीय मानक ब्यूरोची पहिली एसडीओ संस्था म्हणून घोषित झाली आहे.
भारत सरकारच्या अखत्यारीतील या दोन संस्थांचा हा पुढाकार देशातील सर्वच प्रमुख संशोधन आणि मानक विकास संस्थांकरिता केवळ एक आदर्शच निर्माण करणार नाही तर त्यांना जागतिक दर्जाची मानके प्राप्त करण्यासाठी प्रेरीतही करेल.
भारत सरकारच्या “एक राष्ट्र एक मानक” संकल्पनेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी राष्ट्रीय मानक संस्था भारतीय मानक ब्यूरोने (बीआईएस) एक योजना सुरु केली आहे. या अंतर्गत योग्य संस्थेला एसडीओ म्हणून मान्यता दिली जाते. आपल्या विशिष्ट क्षेत्रातील मानकांच्या विकासासाठी कार्यरत देशांच्या विविध संस्थांमधे उपलब्ध क्षमता आणि विशिष्ट कार्यक्षेत्रात उपलब्ध सकल तज्ञ यांना एकीकृत करणे हे बीआयएसचे या योजनेच्या माध्यमातून लक्ष्य आहे. या प्रकारे देशात सुरु असलेल्या सर्व मानकांसंबंधीत घडामोडींचे रुपांतर एका विषयावर एक राष्ट्रीय मानक तयार करायचे आहे.
देशातील मानके निश्चित करणाऱ्या प्रमुख संस्थापैकी लखनऊ इथली रेल्वे मंत्रालयाची एकमेव संशोधन आणि विकास संघटना आरडीएसओ ही आहे. भारतीय रेल्वेसाठी मानके निश्चित करण्याचे काम ती करते. 
आरडीएसओने बीआयएस एसडीओ मान्यता योजने अंतर्गत मानक विकास संघटनेच्या (एसडीओ) रूपात मान्यता प्राप्त करण्याचे पाऊल उचलले. या प्रक्रियेत आरडीएसओने मानक निर्माण प्रक्रियेचा अभ्यास केला जेणेकरुन त्यांना मानकीकरणाच्या सर्वोत्तम अभ्यासासह  पुन्हा संरेखित केले जाऊ शकेल. याची नोंद  डब्ल्यूटीओ-टीबीटी च्या उत्तम अभ्यास संहितेतकरण्यात आली आणि बीआईएस द्वारे एसडीओच्या रूपात मान्यतेसाठी आवश्यक मापदंड म्हणून अनिवार्य केले.
बीआयएसने आरडीएसओच्या मानक निर्माण प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर 24 मे 2021 रोजी आरडीएसओला एसडीओ (मानक विकास संघटना) म्हणून मान्यता दिली. याचबरोबर आरडीएसओ, बीआयएस एसडीओ मान्यता योजनेत मान्यता प्राप्त करणारी देशातील पहली मानक विकास संघटना ठरली आहे. बीआयएस द्वारे एसडीओच्या रूपात आरडीएसओच्या मान्यतेची कक्षा “भारतात रेल्वे परिवहन क्षेत्रासाठीची उत्पादने, प्रक्रिया आणि सेवांकरता मानक विकास करणे आहे. मान्यता 3 वर्षांसाछी वैध आणि वैधता कालावधी संपल्यावर नुतनीकरण आवश्यक असेल.
आरडीएसओमधे मानक विकासाची प्रक्रिया आता सर्वानुमते निर्णय घेण्यावर केंद्रीत असेल. मानक विकासाच्या प्रारंभिक टप्प्यापासून ते मानकाला अंतिम रुप देईपर्यंत उद्योग, संस्थात्मक, उपयोगकर्ता, मान्यता प्राप्त प्रयोगशाळा, चाचणी करणाऱ्या संस्था इत्यादि सहीत सर्व घटकांची व्यापक भागीदारी असेल.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.