पोलिस प्रशासन

औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद, खुलताबादला मोठा फौजफाटा तैनात

भारतीय पुरातत्त्व खात्याचा आदेश

औरंगाबाद: जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादविवाद सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर पर्यटक व इतर लोकांना बघण्यासाठी बंद करण्यात आलेली आहे. या बाबतचा आदेश काल भारतीय पुरातत्त्व विभागाने काढला आहे.
काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते तेलंगणाचे आ. अक्रबुरोद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जावून पुष्प अर्पण करून नतमस्तक झाल्याने यावरून महाराष्ट्रासह देशभरात वाद निर्माण झाला होता.त्यानंतर या विषयावरून जोरदार राजकारण सुरू झालेलं असून वादविवाद होत आहे.

दरम्यान एका राजकीय पक्षाने छत्रपतींच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच काय काम ? असा प्रश्न उपस्थित करून कबर तोडण्याची धमकी दिल्याने खुलताबादमधे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीस प्रशासन दर्गा कमिटीच्या पदाधिका-यांनी शेकडो तरूणांची समजूत घालून वातावरण शांत केले होते. भारतीय पुरातत्त्व खात्याने दिलेल्या पत्रानुसार पोलीस प्रशासनाने खुलताबाद येथील औरंगजेब कबर व दर्गा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. तसेच कबर परिसरात सशस्त्र सुरक्षा दलाचे पहारेकरी नेमण्यात आलेले आहे.
बुधवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी औरंगजेब कबर परिसराची पाहणी करून सुरक्षेसंबधी आढावा घेतला होता. बुधवारी दुपारनंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या औरंगजेबाची कबर सध्या सुरू असलेल्या सामाजिक वादविवादामुळे परीस्थिती बिघडू नये म्हणून काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खुलताबाद येथे औरंगजेब यांची कबर बघण्यासाठी सध्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे राजेश वाकलेकर यांनी माध्यमांना दिलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.