मुंबईराजकीय

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा ‘किमान समान कार्यक्रमात’ नव्हताच – शरद पवार

मुंबई : उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर आता एकनाथ शिंदेंच सरकार सत्तेवर आलेलं आहे. तर काही दिवसांपूर्वी सत्ताधारी असणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी बाकावर गेले आहेत. याच दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर निशाणा साधलायं. शिवसेनेत यापूर्वी देखील बंड झालेले होते,मात्र आताच्या बंडाच्या निर्णयाला काहीच आधार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. या सर्व बंडखोरांना जनतेसमोर येऊन बंडाच खरं कारण सांगावंच लागेल असंही ते म्हणाले.

हे पण वाचा : लोकशाही बळकट करण्यासाठी न्यायव्यवस्था बळकट असणे गरजेचेः नितीन गडकरी

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका लागणार नाही

तसेच मध्यावधी निवडणुका लागतील असं मी म्हणालेलो नाही. पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असं मी म्हटलं होत. आपल्या हातात दोन वर्ष आहे. हे लक्षात ठेऊन कामाला लागलं पाहिजे. 2024 साली महाविकास आघाडीने निवडणूका एकत्र लढवाव्यात अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा ठरवू, असंही पवार म्हणाले.

औरंगाबाद नामांतराबाबत अनभिज्ञ

एकनाथ शिंदेंच बंड हे काही एका दिवसात झालेलं दिसत नाही.त्यासाठी आधीच तयारी झाली असेल असंही पवार म्हणाले.बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी जी तत्परता दाखवली. अशी तत्परता दाखवणारे ते पहिले राज्यपाल आहे. पहिल्यांदाच 48 तासांत बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला. तसेच औरंगाबादच्या नामांतराच्या निर्णयाबाबत सुसंवाद नव्हता.तो मंजुर झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली, अशीही कबुलीही पवार यांनी दिली.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.