Crime

कंत्राटी डाॕक्टरला 60,000 रूपयांची लाच भोवली, ACB च्या जाळ्यात अडकला

चाळीसगाव- जिल्ह्यात पुन्हा एकदा लाचखोरीने डोके वर काढलेले असून आज चक्क एक कंत्राटी डाॕक्टर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका 29 वर्षीय तक्रारदार यांच्या दोन अँम्बुलन्स (रुग्णवाहीका) असुन त्या कोरोना काळात क़ोरोना रुग्ण चाळीसगाव तालुक्यातील गाव-खेड़यांतुन तसेच चाळीसगाव येथुन जळगाव येथे ने-आण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर चाळीसगाव येथे भाडे तत्वावर लावण्यात आल्या होत्या, सदर रुग्ण वाहिकांचे मिळणाऱ्या बिलांची पडताळणी करुन त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव यांचे सही शिक्यानिशी लागणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर चाळीसगाव यांचे कडुन पडताळणी करून आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आरोपी 108 रूग्णवाहीका वरील कंत्राटी डॉक्टर नामे मुश्ताक मोतेबार सैय्यद ,(B.A.M.S.), यांनी पंचासमक्ष ६०,०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतः आरोपी यांनी त्यांचे घाटरोड, चाळीसगाव येथील त्यांचे खाजगी सैय्यद क्लीनिक या ठिकाणी पंचासमक्ष स्विकारली म्हणुन त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या प्रकरणी हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आलेले आहेत.
सदरील कारवाई ही श्री.सुनील कडासने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP. श्री.शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे. कॉ. अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ. यांच्या पथकाने मिळून केलेली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
दुरध्वनी क्रं. 0257-2235477
मोबा.क्रं. 8766412529
* टोल फ्रि क्रं. 1064

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.