क्राईम

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड, 11 महिलांवर गुन्हा दाखल

चोपडा- शहरातील एका परिसरातील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून 23 ललनांची सुटका केलेली असून यातील 11 महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात अनैतिक देहव्यापार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीसांनी धाड टाकून तब्बल 23 ललनांची सुटका करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 11 महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांना मिळाली. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह त्यांच्या पथकाने बुधवारी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.
यात जिल्ह्यासह परराज्यातील तब्बल 23 महिला आढळून आलेल्या आहेत. सर्व महिलांची सुटका करण्यात आलेली आहे. याप्रकरणात कुंटनखाना चालविणाऱ्या 11 महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात अवैध देहव्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आले. याठिकाणी नेपाळ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगालमधील तरूणींना आणले जात असून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतला जात आहे. या परिसरात यापूर्वी सुद्धा पोलीस कारवाया झालेल्या असून सुद्धा याठिकाणी देहव्यापार सुरूच असल्याचे समोर आलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.