राजकीय

कुऱ्हा परिसरात वादळामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खडसेंकडून पाहणी

मुक्ताईनगर दिः 29 रोजी कुऱ्हा परिसरातील रिगाव आणि पिंप्राळा शिवारात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे घरांची पडझड झाली. तसेच शेती शिवारात मोठया प्रमाणात नुकसान झाले.जुने पिंप्राळा शिवारात असणाऱ्या
चैतन्य हनुमान मंदिर येथे मंदिराजवळ असणाऱ्या पिंपळ आणि कडुलिंबाची फांदी तुटून पडल्यामुळे महंत दरबार पुरी महाराज आणि इतर चार भाविक गंभीर जखमी झाले.तसेच येथे असणाऱ्या गोशाळेतील दोन गायी मृत्युमुखी पडल्या व काही गंभीर जखमीही झाल्या.


रिगाव येथे सुद्धा वादळामुळे घरावरील पत्रे उडाली ,काही घरांवर झाडाच्या फांद्या कोसळल्या त्यामुळे घराचे आणि जनावरांच्या गोठयांचे नुकसान झाले शेती शिवारात सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान झाले
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी पिंप्राळा आणि रिगाव येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच तहसीलदार यांचे सोबत चर्चा करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे असे सांगितले.
विद्युत वितरणचे अभियंता राठोड यांच्या सोबत चर्चा करून वादळामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारांची जोडणी करून विद्युत पुरवठा लवकरात लवकर पुर्ववत करावा असे सांगितले.
यावेळी यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, डॉ बि सी महाजन, उपसरपंच पुंडलिक कपले, विशाल महाराज खोले, सरचिटणीस रविंद्र दांडगे,ओमप्रकाश चौधरी, रणजित गोयनका, डॉ गजानन खिरळकर, रमेश खंडेलवाल,रिगाव सरपंच निर्मलाताई पारधी ,
उपसरपंच शोभाताई गणेश विटे , आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.