राजकीयराष्ट्रीय

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी क्रीडापटुंना रोख पुरस्कार, राष्ट्रीय कल्याण आणि निवृत्तीवेतनासाठी सुधारित योजना सुरू केली

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत खेळाडूंसाठी रोख पुरस्कार तसेच खेळाडूंसाठी राष्ट्रीय कल्याण आणि पेन्शन (एनएसडीएफ) सुधारित योजना सुरू केली तसेच क्रीडा विभागाच्या योजनांसाठी dbtyas-sports.gov.in हे संकेतस्थळ आणि राष्ट्रीय क्रीडा विकास निधीचे संकेतस्थळ nsdf.yas.gov.in  याची सुरुवात केली.

अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली की, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्यांना तसेच त्यांच्या प्रशिक्षकांना रोख पुरस्कार देण्याच्या य़ोजना, क्रीडा विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण आणि गुणवत्ता धारक खेळाडुंना निवृत्तीवेतन (पीडीयूएनडब्ल्यूएफएस) देण्याच्या योजनेत  अनेक महत्वाचे बदल केले असून या योजना अधिक खेळाडूस्नेही, सहज उपलब्ध होण्यासारख्या आणि पारदर्शक बनवण्याचा दृष्टीकोन यामागे आहे.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, हे पाऊल म्हणजे किमान सरकार, कमाल प्रशासन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन पुढे घेऊन जाण्याच्या आणि सरकार आणि नागरिक, व्यवस्था आणि सुविधा तसेच प्रश्न आणि उपाय यांच्यातील तफावत भरून काढून नागरिकांना सक्षम करताना डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मंत्र्यांनी स्पष्ट केले की या सुधारित योजना क्रीडापटुंना विक्रमी वेळेत लाभ देण्यात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व प्रदान करतील.

कोणताही वैयक्तिक खेळाडू त्याच्या किवा तिच्या क्षमतेनुसार, तिन्ही योजनांच्या लाभांसाठी थेट अर्ज करू शकेल, यावर ठाकूर यांनी प्रकाश टाकला. यापूर्वी प्रस्ताव क्रीडा महासंघ किंवा एसएआय (भारतीय क्रीडा प्राधिकरण) यांच्या माध्यमातून येत होते आणि प्रस्ताव सादरीकरणातही मोठा विलंब होत असे. काही वेळा तर एखादा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी एक ते दोन वर्षाचा कालावधीही लागत असे. रोख पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव योग्य वेळेत सादर होऊन त्यानंतरची मंजुरी वेळेवर मिळण्याची सुनिश्चिती करण्यासाठी, आता विशिष्ट क्रीडास्पर्धा संपण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत अर्जदाराने केवळ ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.