केंद्रीय योजना

केंद्रीय मंत्रिमंडळाने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेंतर्गत (ABRY) नोंदणीची अंतिम तारीख 30 जून वरून 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली

नवी दिल्ली,
पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेंतर्गत (एबीआरवाय)लाभ उठवण्यासाठी  लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठीची मुदत  आणखी नऊ महिन्यांसाठी म्हणजे 30 जून , 2021 वरून  31 मार्च , 2022 पर्यंत वाढवायला मान्यता दिली आहे.  या मुदतवाढीमुळे  औपचारिक क्षेत्रात 71.8 लाख रोजगार  निर्माण होतील. यापूर्वी 58.5 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज वर्तवण्यात आला होता.  18.06.2021 पर्यंत एबीआरवाय अंतर्गत, 79,577 आस्थापनांमधून 21.42  लाख लाभार्थ्यांना 902  कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
31.03.2020 पर्यंतच्या प्रस्तावित नोंदणी कालावधीसाठी अंदाजे खर्च  22,098  कोटी रुपये असेल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत ही योजना विविध क्षेत्रातील / उद्योगांमधील नियोक्तांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि अधिक कामगार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राबवली जात आहे.
एबीआरवाय अंतर्गत ईपीएफओकडे नोंदणीकृत आस्थापने व 15,000/- वेतन मिळवणाऱ्या  नवीन कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल जर आस्थापनाने नवीन कर्मचारी किंवा 01.03.2020 ते 30.09.2020 दरम्यान नोकरी गमावलेले लोक भर्ती केले असतील
एबीआरवाय अंतर्गत, ईपीएफओ नोंदणीकृत आस्थापनांच्या सामर्थ्यानुसार केंद्र  सरकार कर्मचारी आणि  नियोक्ते हिस्सा (वेतनाच्या 24%) ‘ किंवा फक्त कर्मचार्‍यांचा हिस्सा (वेतनाच्या  12%) दोन वर्षांच्या कालावधीसाठी जमा करत आहे. कामगार व रोजगार मंत्रालयाच्या व ईपीएफओच्या संकेतस्थळावर योजनेची सविस्तर मार्गदर्शक सूचना पाहता येईल.
कोविडनंतर  अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि औपचारिक क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी आत्मनिर्भर  भारत 3.0 पॅकेज अंतर्गत एबीआरवाय ची घोषणा  केली गेली. ही योजना देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोविड-19 परिणाम कमी करेल आणि कमी पगाराच्या कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी कमी करेल आणि नियोक्तांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आणि विस्तारीकरणासाठी प्रोत्साहन देईल.
 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.