राजकीयवृत्तविशेष

केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक ? महाराष्ट्रातून राज्यसभेवर मराठा उमेद्वार देण्याची शक्यता,राज्यात खळबळ

नवीदिल्ली – सध्या महाराष्ट्रासह देशातील राजकीय वातावरणात बदलांचे वारे वाहत असून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाच्या राज्यसभेच्या कोट्यातून महाराष्ट्रातून एक मराठा चेहरा राज्यसभेवर पाठविण्याची तयारी करून मास्टरस्ट्रोक मारणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. “आप”च्या या खळबळजनक राजकीय हालचालींमुळे राज्याच्या राजकीय गोटात चर्चांना उधाणं आलेल आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाकडून दिल्ली, पंजाबनंतर आता ‘आप’ने महाराष्ट्रात पक्षविस्ताराचे धोरण राबवायला सुरुवात केल्याचे संकेत या घडामोडींवरून दिसून येत आहे.काल निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 15 राज्यांतील 57 जागांसाठी निवडणुकांची घोषणा केली. यामुळे पंजाब मध्ये काँग्रेसच्या अंबिका सोनी शिरोमणी अकाली दलाचे बलविंदर सिंग भुंदर यांची राज्यसभेच्या खासदारकीची मुदत आता संपली आहे.पंजाब विधानसभेच्या निवडणूकीमध्ये “आप” ने मोठा विजय मिळवलेला असून यामुळे त्यांचे संख्याबळ वाढलेलं आहे.त्यामुळे या दोन्ही जागा आता आम आदमी पक्षाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झालेलं असून त्यामुळे त्यांनी यातील एका जागेसाठी महाराष्ट्रातील खास करून मुंबई विभागातील मराठा नेत्याला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी अरविंद केजरीवाल यांनी केल्याची समोर आलेली आहे.यामुळे महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसह इतर निवडणूकांमध्ये “आप” ला फायदा होईल,असे अरविंद केजरीवाल यांना वाटत आहे.यासाठी त्यांनी पंजाब निवडणूकीचे रणनीतीकार खासदार संदीप पाठक यांच्याकडे जबाबदारी सोपवल्याचे बोलले जात आहे.
या नावांचीही चर्चा सुरू
संभाजीराजे छत्रपती, विदर्भवादी नेते श्रीहरी अणे, घटनातज्ज्ञ उल्हास बापट किंवा जेष्ठ समाजसेवक आणी केजरीवालांचे आदर्श अण्णा हजारे यांच्या जवळची एखादी व्यक्ती अशा नावांचीही चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.