कृषि

केळी पिकावर सी.एम.व्ही. कुक्कुबर मोझॕक व्हायरसचा हल्ला- आ. चंद्रकांतभाऊ पाटील

मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पिकावर सि.एम.व्ही. कुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त बनला आहे. अक्षरशः शेतकरी केळी उपटून फेकत असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तहसीलदार व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन खामखेडा , सुकळी, उचंदा, शेमळदे ,मेळसंगवे या परिसदात थेट बांधावरच पोहोचले व नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली .यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना करीत चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला .तसेच आमदार पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्याशी यासंदर्भात भ्रमणध्वनिवरून चर्चा केली . जैन आणि मध्यप्रदेशातील रेवा या टिश्यूकल्चर कंपनी कडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई होणे संदर्भात कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली. शेतकरी वर्ग कधी नापिकी , कधी जास्त पाऊस तर कधी पिकावरील रोगराई यामुळे सतत अडचणीत असतो. मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड केली जाते परंतु याच पिकांवर आता सि.एम.व्ही. कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा या परिस्थितीत पुन्हा शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यात जवळपास 3600 हेक्टर वर केळी लागवड केली जाते. नैसर्गिक संकटे , वादळी वारे , विजेचा तुटवडा अशा एका ना अनेक संकटांना लढा देत केळी पीक जगवतात अशा परिस्थितीत यंदा कोरोनाचे संकट टाळण्याची चिन्हे नाहीत मात्र आता तालुक्यात केळी रोपांवर सि.एम.व्ही. कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी शेतातील मशागत नांगरणी , वखरणी तसेच लावगड अशा कामांना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे .आज केळी रोपांची वाढ जवळपास तीन ते साडेतीन फूट इतके झालेली आहे. परंतु सदर केळी पिकावर सि.एम.व्ही. कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे .अशा परिस्थितीत केळी ची झाडे उपटून फेकावे लागत आहे. जवळपास एक रोप हे चौदा ते पंधरा रुपयांमध्ये शेतकऱ्याला मिळत आहे. तसेच या रोपासाठी खर्च इतर मशागत करून शेतकरी सज्ज झाला होता .परंतु या व्हायरस मुळे शेतकरी मोठा हवालदिल झालेला आहे. आधीच लॉकडाउनमुळे आधीचे केळी पिक कवडीमोल भावात विकावे लागले आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे मागील वर्षी शेतकऱ्याला केळी पिकात प्रचंड नुकसान उचलावे लागले होते. निदान या वर्षी तरी झालेले नुकसान निघेल अशा आशेवर शेतकरी असताना पुन्हा व्हायरसमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा अपेक्षाभंग झालेला आहे. तरी यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार शाम वाडकर , प्रभारी तालुका कृषी अधिकारी पगार व कृषी विभागाचे कृषी सहायक व कर्मचारी यांना सोबत घेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली .व प्रारूप स्वरूपात स्थळ पंचनामे करून उर्वरित नुकसान ग्रस्त केळी लागवड शेती क्षेत्राचे पंचनामे करून जैन टिश्यूकल्चर व मध्यप्रदेशातील रेवा टिश्यूकल्चर या कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी या संदर्भात कृषी मंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्याशी थेट शेतीच्या बांधवरूनच भ्रमणध्वनीवरून चर्चा करीत शासनाकडे तात्काळ अहवाल पाठविण्याचा सूचना केल्या तसेच केळी उत्पादक केळी पीक विम्याचा लाभ तसेच शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यास पाठपुरावा करणार असे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना आश्वस्त करीत आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
याप्रसंगी परिसरातील केळी उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते .
Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.