पालकमंत्री

कोकणवासीयां प्रमाणेच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मुक्ताईनगर- दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रावेर मुक्ताईनगर तालुक्यातील केळी व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे अनेक घरांची पडझड झाली आहे याची पाहणी साठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत या पाहणी दरम्यान बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की केळी पिकाची पूर्णपणे नुकसान झाले आहे मेढोळदा या गावातील अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे जी मदत शासनाकडून मिळणार आहे ती 100% मदत मिळेल मेंढाळदा हे गाव पुनर्वसित गावात असून या गावातील जमिनीची दोनशे रुपये प्रति स्केअर फूट ही किंमत केली गेली आहे ती किंमत पहिल्यांदा कमी करावा लागेल साठी प्रस्तावही मदत व पुनर्वसन खात्याकडे पाठवण्यात आलेला आहे कायमस्वरूपी येणार हे संकट टाळण्यासाठी पुनर्वसन मंत्री स्थानिक आमदार गावातील नागरिक आणि मी स्वतः येत्या आठ दिवसांमध्ये बैठक घेऊन त्यांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणार आहे या गावातील एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे की त्यांना खायला सुद्धा नाही स्थानिक आमदारांच्या वतीने अन्नदान सुरू आहे इतकी वाईट परिस्थिती आहे कोकणवासीयांना ज्या पद्धतीने शासनाने मदत दिली त्याच पद्धतीने जळगाव वासियांना ही शासनाने मदत करावी अशी मागणी मी कॅबिनेटमध्ये करणार आहे अशी प्रतिक्रीया पाहणी दरम्यान पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.