सामाजिक उपक्रम

कोकण पूरग्रस्तांना जळगावातील सेवाभावी संस्थांचा मदतीचा हात

कोकण पूरग्रस्थांना जळगावातील सेवाभावी संस्थांचा मदतीचा हात

जळगाव दि- 28 कोकणात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी महापूर येऊन आणि दरड कोसळून 40 जणांचा मृत्यू झाल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
अनेकांची घर दार आणि संसारोपयोगी वस्तू महापूरात वाहून गेल्याने ,आता जगायचं कस? असा प्रश्न या कोकणवासियांच्या पुढे आ वासून उभा राहिलेला असल्याने ,या ठिकाणच्या नागरिकांच्या मदती साथी जनतेने आणि सामजिक संस्थांच्या वतीने मदत उभी करून द्यावी अशा प्रकारचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते.
प्रशासनाच्या या आवाहनाला जळगाव शहरातील सेवारथ परिवाराने पुढाकार घेऊन मदत गोळा करण्यात सुरुवात केली असता अनेक सेवाभावी व सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी या वेळी सढळ हाताने मदत केली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे.
मदत करणाऱ्या संस्थांच्या मध्ये प्रामुख्याने सेवारथ परिवार, सुमतीलाल टाटिया,जैन श्र्वेतांबर मूर्ती पूजक संघ,जैन महिला मंडळ,सिंधी समाज,रोटरी क्लब जळगाव मिड टाऊन,चटई असो,रत्ना जैन,विजय रेवतानी,कस्तुरीचंद बाफना,लघु उद्योग भारती,सेवा धर्म परिवार यांचा समावेश होता.

कोकणातील पूरग्रस्त जनतेला सध्या येत असलेल्या प्रचंड अडचणी पाहता त्यानुसार मदत साहित्य गोळा करण्यात आले आहे.या मध्ये साड्या,शर्ट पँट,महिलांसाठी सॕनीटरी पॕड, टिकाव, फावडे,रिकामे डबे,भिस्किट पुढे,मॕगी,तेल,चहा,साखर,हळद, आटा,चटई,पाणी शुद्ध करण्याचे ड्रॉप,लहान मुलांचे कपडे, चपला,औषधी ,प्लास्टिक शीट, फिनाॕईल इत्यादी प्रकारच्या साडेसात लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आलेल्या आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सूमतीलाल तातिया यांचा सत्कार करण्यात आला,तर सेवारत परिवाराचे डॉ रितेश पाटील आणि दिलीप गांधी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सामाजिक संस्थांनी केलेली ही मदत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून थेट पूरग्रस्तांच्या साठी वाटप केली जाणार आहे.
प्रशासनाच्या मदती साठी सेवारत परिवाराच्या सह पन्नास कार्यकर्ते हे मदत वाटप साठी कोकणाकडे रवाना झाले आहेत.

दोन दिवसात तब्बल साडे सात लाखांची मदत केली उभी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मानले आभार

जिल्हाप्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक संस्थांनी केवळ दोन दिवसात साडेसात लाख रुपयांची मदत उभी करून दिल्या बद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व सामजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा प्रशासन आणि सेवा रथ परिवाराचे डॉ रितेश पाटील,दिलीप गांधी,डॉ नीलिमा सेठीया,यांनी केले होते.
या वेळी प्रकाश सेठिया,महेंद्र रायसोनी,राजू अडवाणी,डॉ वडजिकर,किरण गांधी,अनिता कांकरिया,चंद्रशेखर नेवे,समीर साने,सुश्मिता भालेराव,सविता बोरसे, आरती व्यास,मनीषा पाटील,आदित्य पागरिया,दिनेश ठक्कर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.