क्राईम

कोट्यवधींची बोगस कर्ज प्रकरणे आता आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर

जळगाव – जळगाव जिल्ह्यात एकीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला काल ईडीने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू होऊन खळबळ उडालेली असतानाच काल जिल्ह्यात BHR घोटाळ्याप्रकरणी भाजपच्या आमदाराचे नाव समोर आल्याने खळबळ उडालेली आहे. यात भरीच भर म्हणून आणखी एक मोठा बोगस कर्ज प्रकरणांचा घोटाळा समोर येत असून भविष्यात त्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा संशयीत आरोपींचे अटकसत्र राबविणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आलेली आहे.

जळगाव येथील अण्णा भाऊ साठे, व महात्मा फुले विकास महामंडळाच्या कोट्यवधींच्या बोगस व काल्पनीक लाभार्थ्यांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या नावे काढलेल्या कर्ज प्रकरणांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी जळगावसह भुसावळातील “लोन माफियां”सह इतर काही जणांना आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी भविष्यात अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात अनेक दिग्गज राजकीय पदाधिऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे.
परंतु याबाबत तपास कार्यावर कोणताही परीणाम होऊ न देता अजून तांत्रिकदृष्ट्या वेगवान आणि गोपनीय पद्धतीने इतरही राष्ट्रीयकृत बँकांतील घोटाळ्याचा सखोल तपास सुरू असून भक्कम पुरावे जमा करणे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणी तपासा कार्यात ज्या पद्धतीने वेगवान प्रगती होऊन दिग्गजांना अटक झालेली आहे, त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढलेली असून भविष्यात संशयीतांचे अटकसत्र सुरू झाल्यास त्यामुळे येणाऱ्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भुसावळातील राजकारणात मोठा भूकंप होऊन याचा निवडणूकीवर परीणाम होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.