शासन निर्णय

कोणतीही बँक बुडाली तर खातेधारकांना 90 दिवसात 5 लाखाचे विमा कवच मिळेल

नवी दिल्ली, दि-28 : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी सर्व सामान्य माणसासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली आहे. या बैठकीत DICGC कायद्यातील सुधारणेला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता या संदर्भातील बिल संसंदेत मांडले जाईल. यानंतर जर एखादी बँक बुडाली तर ग्राहकांना विम्याची रक्कम 90 दिवसांच्या आतमध्ये मिळून जाईल.
किती मिळेल विम्याची रक्कम?
बँक बंद झाल्यास खातेधारकाला 90 दिवसांच्या आतमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळण्याबाबतच्या DICGC कायद्यातील सुधारणेच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी मिळालेली आहे.

दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायद्यातील सुधारणेला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे की , आज इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन बिल, 2021 ला मंजुरी देण्यात आली. त्यांनी असेही स्पष्ट केलेले आहे की, यामुळे विम्याची मर्यादा वाढेल आणि याअंतर्गत 99 टक्के बँक खातेधारक कक्षेत येत आहेत.

दरम्यान हे बिल संसदेच्या मान्सून सत्रात मांडण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे खातेधारक आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशासंदर्भात नक्कीच सुरक्षा मिळेल. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर जर एखाद्या खातेधारकाची बँक बुडाली तर त्याला 90 दिवसांच्या आतमध्ये विम्याची रक्कम मिळेल. यामध्ये ग्रामीण भागातील सर्व बँकांसह सर्व वाणिज्य किंवा वित्तीय संस्थांकडून नियंत्रित होणाऱ्या बँकांचा समावेश आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.