आरोग्य

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बालकांना सर्वाधिक धोका नाही- डाॕ रणदीप गुलेरीया AIIMS संचालक

नवी दिल्ली दि-24 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्यानंतर आता काही प्रमाणात रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र आजही रोज देशभरात दोन लाखांच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट अद्याप ओसरलं नसताना सरकार आणि प्रशासनाला तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात असल्याने पालकही चिंतेत होते. मात्र तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग मुलांना होईल असं वाटत नाही, असे all india institute of medical science Delhi (एम्स)चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज घेतलेल्या पत्रकार परीषदेत स्पष्ट केलेले आहे. डॉ. गुलेरिया यांच्या दाव्यानंतर देशभरातील पालकांना नक्कीच मोठा दिलासा मिळालेला आहे.

देशात कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलेले आहे की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रभावित झाले नाहीत. त्यामुळेचे तिसऱ्या लाटेतही लहान मुलांना सर्वाधिक धोका असेल असे वैज्ञानिकांच्या अभ्यासात वाटत नाही किंवा तसे कोणते संकेतही मिळालेले नाहीत.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आकडेवारी पाहिली तर यात खुप समानता आहे. यामध्ये 18 वर्षाखालील लहान मुले सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. तसेच मुलांना कोरोना झाला तरी लक्षणे सौम्य आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहाना मुलांना सर्वाधिक धोका आहे, हा दावा ज्यांनी केलेला आहे त्यांचे म्हणणे असे आहे की, अद्याप लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त झालेला नाही. म्हणूनच तिसऱ्या लाटेत याचा संसर्ग लहान मुलांना जास्त होऊ शकतो. मात्र यापुढे मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे, याचे कोणतेही पुरावे आतापर्यंत वैज्ञानिकांना अभ्यासात आढळून आलेले नाहीत,असे डॉ. गुलेरिया यांनी जाहीर केले.

म्यूकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही

कोरोनाप्रमाणे काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रसार होत नाही. काळी बुरशी हा संसर्गजन्य आजार नाही. ज्या लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे ,त्यांना याचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो, अशी माहिती डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. काळी बुरशी होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या आजारावर लवकर उपचार केल्यास फायदा होतो. ब्लॅक फंगसची लागण झालेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ बसल्याने हे पसरत नाही, असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.