कोरोनायोद्ध्यांचे वेतन वेळेवर व्हावे-सौ.रोहिणीताई खडसे-खेवलकर,अध्यक्ष जिल्हाबँक

जळगाव दि-31/08/2020 शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या व मागण्यांविषयी निवेदन
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी शासनाचे प्रतिनिधि म्हणुन जळगावचे जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांना आज दिलेले आहे.
निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
1) थकीत मासिक मानधन/वेतन तात्काळ मिळणेबाबत-
कोविड-19 सारख्या साथउद्रेकात स्वत:चा जीव धोक्यात घालुन तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवा करत आहे. शासनाच्या आरोग्य विभागाच्या लेखशिर्षकांवर निधी उप्लब्ध नसल्याने राज्यातील या कोविड योध्दांचे मागिल 4-5 महिन्यांचे मासिक मानधन / वेतन देण्यात आलेले नाही, त्यात उदाहरण द्यायच झाल तर जळगाव 4-5 महिन्यांपासुन, सोलापुर-जालना-पुणे-चंद्रपुर-नासिक-बुलढाणा या सर्वच जिल्ह्यांमध्ये 3-4 महिन्यांपासुन वेतन देण्यात आलेले नाही, त्यामुळे शासनाने प्राधान्याने व तात्काळ निधी उप्लब्ध करुन राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे….
2) बी.ए.एम.एस. आर्हताधारक तदर्थ/कंत्राटी गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतनवाढ करणे बाबत….
शासकीय सेवेत येणारे एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. आर्हताधारक कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामाचे स्वरुप व जोखिम सारखीच असते परंतु, एम.बी.बी.एस. आर्हताधारक कंत्रांटी वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे बी.ए.एम.एस.आर्हताधारक कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानधन/वेतन वाढ देण्यात आलेली नाही.
गट-अ पदावर कार्यरत असलेल्या MBBS वैद्यकीय अधिकाऱ्यांना 75000-80000 व त्याच गट अ पदांवर कार्यरत BAMS वैद्यकीय अधिकाऱ्यांना 40000-45000 रुपये मानधन दिले जाते., दोघांच्या वेतनांमध्ये तब्बल 35000 रुपयांची तफात अाहे. त्यामुळे बी.ए.एम.एस. आर्हताधारक कंत्रांटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर एक प्रकारे अन्यायच आहे. त्यामुळे बी.ए.एम.एस. आर्हताधारक कंत्रांटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये यथोचित वाढ करुन हा अन्याय दुर करावा….
3) राज्यातील बी.ए.एम.एस.आर्हताधारक गट-अ कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावुन घेणेबाबत….
कंत्राटी/तदर्थ नियुक्तीच्या सुरुवातीपासुन सर्व राष्ट्रीय कार्यक्रम, आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवुन आरोग्यसेवा देत आहेत. तसेच कोविड-19 च्या साथरोग उद्रेकाच्या जागतिक संकटात कंत्राटी स्वरुपात नियुक्ति असल्यावर आणि शासकीय सेवेतील पुढील भवितव्याची कुठलीही शास्वती नसतांना देखील कर्तव्याच भान राखुन अहोरात्र निरंतर आरोग्यसेवा (रुग्णसेवा) देत आहेत., अत्यावश्यक सेवा देणाऱ्या या कोविड योध्दांना आपण सन्मानपत्र देऊन, दिवे लावुन, टाळ्या वाजवुन व अन्यप्रकारे सर्वांनीच त्यांना सन्मानित केले किवा त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे. परंतु राज्यात हजारांच्या वर कार्यरत असलेल्या बी.ए.एम.एस. आर्हताधारक कंत्रांटी/तदर्थ व्यक्तिना नियमित सेवेत सामावुन घेतल्यास त्यांचा खऱ्या अर्थाने सत्कार / सन्मानीत करता येईल.त्यामुळे अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या या बी.ए़.एम.एस.कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावुन घेण्यात यावे….
याविषयी लेखी निवेदन देण्यात आले.तसेच कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना इन्सेटिव्ह व प्रोत्साहन मिळण्याकरीता देखील मागणी केली.
यावेळी जळगाव जिल्ह्यपरीषदेचे आरोग्य सभापति श्री रविंद्र सुर्यभान पाटील, कंत्राटी/तदर्थ वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकुर, जि.प.मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.आर.एस.अडकमोल, जिल्हा सचिव श्री मिलिंद लोणारी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा मा.नगरसेवक श्री.अशोकभाऊ लाडवंजारी,डॉ प्रितेश नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.