कोरोना उद्रेक -जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाबाधीत वाढले

जळगाव दि-15/03/2021 – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आज तब्बल 992 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे अत्यावश्यक बनलेले आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 430, जळगाव ग्रामीण 54, भुसावळ 7,3अमळनेर 15, चोपडा 97,पाचोरा 21, भडगाव 08,धरणगाव 40,यावल 32,एरंडोल 25,जामनेर 05, रावेर 25,पारोळा 15, चाळीसगाव 94,मुक्ताईनगर 20, बोदवड 26 आणि इतर जिल्ह्यातील 12 असे एकूण 992 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 716 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 62318 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 7852 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 71619 इतकी झालेली आहे. जिल्ह्यात आज 5 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1449 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.