आरोग्य

कोरोना -जळगाव जिल्ह्यात आज तब्बल 982 कोरोनाबाधीत आढळले

जळगाव दि-12/03/2021 – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आज तब्बल 982 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे अत्यावश्यक बनलेले आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 363, जळगाव ग्रामीण 17, भुसावळ 198 ,अमळनेर 14, चोपडा 74,पाचोरा 30, भडगाव 1 ,धरणगाव 8,यावल 11,एरंडोल 04,जामनेर 40, रावेर 18,पारोळा 47, चाळीसगाव 142,मुक्ताईनगर 04, बोदवड 06 आणि इतर जिल्ह्यातील 03 असे एकूण 954 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 512 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 60517 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 6713 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 68662 इतकी झालेली आहे. जिल्ह्यात आज 5 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1432 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.