आरोग्य

कोरोना- जळगाव जिल्ह्यात आज कोरोना रूग्ण एक हजार पार

जळगाव दि-22/03/2021 – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज तब्बल 1090 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत.त्यामुळे प्रत्येकाने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे अत्यावश्यक बनलेले आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 444, जळगाव ग्रामीण 36 , भुसावळ 119 ,अमळनेर 50, चोपडा 76,पाचोरा 26, भडगाव 14 ,धरणगाव 61,यावल 17 ,एरंडोल 40,जामनेर 69, रावेर 13,पारोळा 17,चाळीसगाव 56,मुक्ताईनगर 42, बोदवड 09 आणि इतर जिल्ह्यातील 01 असे एकूण 1090 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 907 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 67096 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 9873 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 78470 झालेली आहे. जिल्ह्यात आज 11 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1501 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.