आरोग्य

कोरोना- जळगाव जिल्ह्यात आज 1194 कोरोनाबाधीत आढळले

जळगाव दि-28/03/2021 – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढतच असून आज तब्बल 1194 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे हाच उत्तम पर्याय आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 284, जळगाव ग्रामीण 20, भुसावळ 106, अमळनेर 27, चोपडा 293 ,पाचोरा 33 , भडगाव 110,धरणगाव 64,यावल 47,एरंडोल 25,जामनेर 25, रावेर 10, पारोळा 31,चाळीसगाव 74,मुक्ताईनगर 11, बोदवड 15 आणि इतर जिल्ह्यातील 19 असे एकूण 1194 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 967 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 72745 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 11155 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 85483 झालेली आहे. जिल्ह्यात आज 14 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1583 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.