आरोग्य

कोरोना- जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाबाधीत रूग्ण वाढले

जळगाव दि-06/03/2021 – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज तब्बल 610 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले आहेत.त्यामुळे प्रत्येकाने आता मास्क लावणे आणि जास्त खबरदारी घेणे अत्यावश्यक बनलेले आहे.
आज जिल्ह्यात जळगाव शहर 334, जळगाव ग्रामीण 30 , भुसावळ 38 ,अमळनेर 11, चोपडा 67 ,पाचोरा 02, भडगाव 03 ,धरणगाव 10,यावल 04,एरंडोल 03,जामनेर 02, रावेर 27,पारोळा 16 , चाळीसगाव 15,मुक्ताईनगर 26, बोदवड 19आणि इतर जिल्ह्यातील 03 असे एकूण 610 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.
आज दिवसभरात 327 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 58222 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 4407 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 64032 इतकी झालेली आहे. जिल्ह्यात आज 2 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1403 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.