आरोग्य

कोरोना झटक्यात बरा करणाऱ्या “या” मोफत औषधाची देशभर रंगली चर्चा

हैदराबाद : कोरोनाबाधीत रूग्णाच्या डोळ्यात औषध टाकल्यानंतर ऑक्सिजन पातळी वाढवणारे औषध नेल्लोरे जिल्ह्यातील कृष्णपट्टणम येथील एका वैद्याने तयार केलेले असून ते घेण्यासाठी लाखो लोक रांगा लावत आहेत. या वैद्याचे नाव आनंदय्या असे आहे. सर्वात विशेष म्हणजे ते औषध मोफत देत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या औषधाचा गुण येत असल्यामुळे अनेक नेते, अधिकारी त्याचा लाभ घेत असून आनंदय्या यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करीत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडलेल्या रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक हानी होत असताना ही घटना आंध्र प्रदेशच नव्हे तर देशात प्रचंड चर्चेचा विषय ठरलेली आहे. हे औषध घेण्यासाठी शेजारील राज्यांतील हजारो लोकही येथे येऊ लागलेले आहेत.

येथील स्थानिक आमदार काकाणी गोवर्धन आणि माजी मंत्री चंद्रमोहन रेड्डी यांनी माध्यमांना सांगितले की, रुग्णाची स्थिती कितीही गंभीर असली तरी दोन दिवसांत रूग्णाचा पॉझिटिव्ह असलेला अहवाल निगेटिव्ह येत आहे. फुफ्फुसातील संसर्गाची HRCT तीव्रता 24.25 च्या घरातून थेट शून्य होत आहे. त्यामुळे या औषधाविषयी देशभर कुतुहुल निर्माण झालेले आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी लोकांची प्रचंड झुंबड उडाल्यानंतर पोलिसांनी औषधाचे वितरण रोखण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने औषधाचे परिक्षण करावे आणि तोपर्यंत वितरण थांबवावे असे सांगण्यात आले, तसेच लोकायुक्तांकडे देखील तक्रारही करण्यात आलेली आहे.

या औषधाचे परिक्षण होणार

यानंतर नेल्लोरेचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व प्रमुख आयुर्वेदिक डॉक्टरांनी औषधाचे परिक्षण केले. त्यानंतर त्यांनी यावर शिक्कामोर्तब देखील केले. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमधील एका तज्ज्ञाने सांगितले की, आमच्यासमोर एका रुग्णाची ऑक्सिजन पातळी 83 होती. डोळ्यांत दोन थेंब टाकण्यात आल्यानंतर ती पातळी 95 पर्यंत वाढली. औषध घेतलेल्या एकाही रुग्णाने आतापर्यंत याबाबत तक्रार केलेली नाही. उलट आनंदय्या यांच्यामुळे जीव वाचल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.तसेच त्यांचे धन्यवाद देखील केलेले आहे.

माझे औषध कोरोना रुग्णांचा जीव वाचविते. मी तीन प्रकारचे औषध देतो. कोरोना संसर्गच होऊ नये, झाल्यास तो बरा करणारे आणि ऑक्सिजन पातळी वाढविणारे असे प्रकार आहेत. मी औषधासाठी एक नवा पैसाही घेणार नाही, असं वैद्य आनंदय्या यांनी म्हटलेले आहे.

मुख्यमंत्री वापरास प्रोत्साहन देणार

आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या औषधाच्या वापरास सरकार प्रोत्साहन देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले. त्यासाठी अधिकाऱ्यांनी औषधाचे वितरण आणि इतर पूरक बाबींचा अभ्यास करून योग्य पावले टाकावीत असा मौखिक आदेश दिलेला आहे.

उपराष्ट्रपतींकडून औषधाची दखल

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही या औषधाची दखल घेतली आहे. आयुष मंत्रालयाचे हंगामी मंत्री किरण रिजीजू आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या औषधाचा अभ्यास करून वितरणाबाबत तात्काळ पावले टाकावीत अशी सूचना त्यांनी केलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.