कोरोना योद्ध्यांचा सन्मान हाच खरा माणुसकीचा “जागर”


भुसावळ – जागर प्रतिष्ठान व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्यावतीने नुकताच कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. जागर प्रतिष्ठान च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, पत्रकार, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय विभागाचे कर्मचारी, अधिकारी, यांचा गौरव करण्यात आला. प्रसंगी व्यासपीठावर रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, जि प सदस्य पल्लवी सावकारे, उद्योजक व श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सभापती मनीषा पाटील, प स सदस्या प्रीती पाटील, नगसेवक पिंटू कोठारी, पत्रकार संघाचे संजयसिंग चव्हाण, सरपंच मनीषा देशमुख, गटविकास अधिकारी विलास भाटकर, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, बि डी धाडी, किशोर वायकोळे, पं स सदस्य सुनील महाजन, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा पंकज पाटील यांनी केले.
कोरोना योद्धांचे कार्य देव दूता प्रमाणे – खा रक्षाताई खडसे
समारंभाच्या प्रमुख अतिथी खासदार रक्षाताई खडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कोरोना काळात सर्वच आपला जीव मुठीत घेऊन थांबले होते. परंतु, या काळात प्रशासकीय शेत्रातील कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी व पोलिस या सर्वांनी केलेले कार्य अतुल्य आहे . कोसळलेल्या कोरोना रुपी महामारी ने चिंताग्रस्त असलेल्या जगाला भयमुक्त केले आहे ते केवळ आणि केवळ कोरोना योद्धा म्हणून कार्यरत माणुसकीने मूळे. त्यामुळे याचे कार्य जणू देव दुता समान असल्याचे प्रतिपादन खा. खडसे यांनी केले.
बीट स्तरीय नियोजनात करणार 700 शिक्षक कोरोना योद्धांचा सन्मान
कोरोना महामारी च्या काळात शिक्षकांनी माझे कुटुंब, स्वस्त कुटुंब अभियानात अत्यंत प्रामाणिकपणे कामगिरी निभावत कोरोना संक्रमणाचा वेग कमी केला आहे. याची दखल घेऊन पंचायत समिती शिक्षण विभाग व जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातशे कोरणा युद्धांचा गौरव बीट प्रमाणे केला जाईल.
- प्रा पंकज पाटील
सोहळ्याचे सूत्रसंचालन राहुल भारंबे तर आभार संजय भटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे राजू फेगडे, प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे, कोषाध्यक्ष ऋषिकेश पवार, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, सचिव प्रा निलेश गुरुचल, , जागर मित्र व तंत्रस्नेही योगेश इंगळे, सुनील वानखेडे, समाधान जाधव, कायदेशीर सल्लागार हरीश पाटील, गोकुळ सोनवणे, पवन पाटील, जीवन महाजन, दीपक राजपूत, अमित चौधरी व जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.