क्राईम
कोरोना लस बनविणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटला भीषण आग

पुणे दि-21- संपूर्ण देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आज आग लागल्याची घटना घडलेली आहे.यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेन संबंधी संशोधन व लस उत्पादन बनविण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. या आगीने रौद्ररूप धारण केलेले असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या अकरा गाड्या रवाना झालेल्या आहेत.सीरम इन्स्टिट्यूटचा हा पुण्यातील मांजरी भागातील नवीन प्रकल्प आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली याचा उलगडा अजून झालेला नाही.मात्र कोव्हिशिल्ड लसीच्या साठवणूकीचा प्रकल्प येथून दूर असल्याची माहिती समोर आलेली आहे.

