Crime

खंडणी प्रकरणी मुंबईतील पोलिस उपायुक्त (DCP) फरार घोषित,पोलिस दलात खळबळ

मुंबई 15 मार्च : मुंबई क्राईम ब्रान्चने व्यावसायिक अंगडिया खंडणी प्रकरणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार आरोपी घोषित केल्याची माहिती समोर आलेली आहे. DCP सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामावर आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित केल्याची वार्ता ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेली आहे. विशेष म्हणजे मुंबई गुन्हे शाखेने याच प्रकरणी L.T. मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओम वंगाटे यांनाही गेल्या आठवड्यात अटक केलेली आहे. आता उपायुक्त(DCP) सौरभ त्रिपाठी यांना फरार आरोपी घोषित करण्यात आलेल आहे. या खंडणी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु असून या प्रकरणात आणखी कुणाची नावे समोर येतात का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी मागील आठवड्यात दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्यावर मुंबादेवी परिसरातील अंगडिया व्यावसायिकांकडून कोट्यवधी रूपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची दखल अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी घेतलेली आहे. त्यांनी याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे अशा तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याप्रकरणी ओम वंगाटे यांनाही अटक करण्यात आलेली आहे. पोलिस उपायुक्त (DCP) दर्जाच्या अधिकाऱ्याला खंडणी प्रकरणी फरार घोषित करण्यात आल्याने मुंबईसह राज्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडालेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.