खडका गोळीबार प्रकरणी आरोपींच्या बनवाबनवीचा भंडाफोड-सोमनाथ वाघचौरे पोलिस उपअधिक्षक

भुसावळ – तालुक्यातील खडका गावात बौद्ध विहाराच्या आवारात सार्वजनिक जागी एका विधी संघर्ष बालकाने विना परवाना गैर कायदा गावठी पिस्तुल बाळगून ते हाताळताना त्या पिस्तुलातून गोळीबार होवून त्यांच्या पायास गोळी लागल्याने जखमी झाला. ते गावठी पिस्तुल घरी लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चौघांना पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी रुपाली संभाजी चव्हाण सपोनि तालुका पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ११/३/२०२१ रोजी रात्री १०.०० ते १०.३० वाजेच्या सुमारास
खडका गावात बौद्ध विहाराच्या आवारात सार्वजनिक जागी विधी संघर्ष बालक याने विना परवाना गैर कायदा गावठी पिस्तुल बाळगून ते गावठी पिस्तुल हाताळताना पिस्तुलचा फायर होवून त्यांच्या पायास गोळी लागून दुखापत होवून रक्त आल्याने त्यांचे साथीदार संकेत उर्फे चेतन संजय सपकाळे,याने सदरचे गावठी पिस्टल हे स्वतःचा घरी लपवून आरोपी पवन रतन सपकाळे ,सचिन उत्तम सपकाळे,सूरज राजेंद्र कोळी सर्व राहणार खडका यातील संकेत उर्फे चेतन संजय सपकाळे यांनी जखमी रोहित याचे खाली पडलेल्या रक्तावर माती व वाळू टाकून मिटवून झाकून ठेवून पुरावा नष्ट केला.आपसात संगनमत करून तिन अनोळखी मुला पैकी एकाने विधी संघर्ष बालक यांचे पोटाला चाकू लावला व पैसे मागू लागला व दुसऱ्याने हाताने मारहाण करताच त्यापैकी एकाने त्यांच्या पायावर पिस्टल मधून गोळी मारली अशी खोटी बनवाबनवीची हकीकत पोलिसांना सांगितली.तसेच मा.जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत जळगांव यांनी कार्यालयीन आदेश क्र. दंडंप्र /१/कावि /२०२१ /५२ दिनांक ५/३/२०२१ अन्वये शस्त्र बाळगण्यास बंदी आदेश असतांना जारी केलेले असतांना मा.जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशाची अवमानता केली म्हणून तालुका पोलीस स्टेशनला गुरुन २९/२०२१ आर्म अँक्ट कलम ३/२५,२७,२९ सह भादवि कलम १८२,२०१,३४ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) ,(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीत पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चाँडक,सपोनि अनिल मोरे,गणेश धुमाळ,पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,सपोनि रुपाली चव्हाण,पोहेकॉ मोरे,पी.एम.सपकाळे,पोहेकॉ.युनूस शेख अशांनी मिळून केली.गु गुन्ह्यातील चौघे आरोपितांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यातील पुढील तपास ए.पी.आय.पवार करीत आहेत.अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.