क्राईम

खळबळ ! BHR घोटाळा प्रकरणी भाजपचा आमदार पोलिसांच्या रडारवर

पुणे – जळगाव जिल्ह्यात एकीकडे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला काल रात्री ईडीने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुरू होऊन जिल्ह्यात खळबळ उडालेली असतानाच आता जिल्ह्यात BHR घोटाळ्याप्रकरणी आणखी एक खळबळजनक बाब समोर आलेली आहे.

बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात जळगाव येथील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल असून, त्यांचा पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस गेल्या पंधरा दिवसांपासून शोध घेत आहे. त्यांचे नाव आजच सर्वांसमोर आल्याने जळगाव जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडालेली आहे. आमदार चंदुलाल पटेल हे माजी मंत्री गिरीष महाजनांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात त्यांना विधान परीषदेचे टिकिट मिळवून देण्यापासून तर निवडून आणण्यापर्यंत आमदार गिरीष महाजनांचाच खारीचा वाटा असल्याचे बोलले जाते. तर आमदार पटेल यांचा आम्ही कसून शोध घेत असल्याचे तपास करणाऱ्या वरीष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांनी “मिडियामेल न्युज”शी बोलताना म्हटलेलं आहे.

दरम्यान, या आधी जळगावमधील मोठ्या राजकीय नेत्यांची नावे BHR घोटाळ्याशी जोडली जात होती. आता या घोटाळ्याप्रकरणी आमदार चंदूलाल पटेल यांचे नाव समोर आलेले आहे. गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तब्बल 15 जणांचे अटक वॉरंट घेऊन जळगावात दाखल झाले होते. त्यात आमदार पटेल यांचेही अटक वॉरंट होते. पण, यावेळी ते पसार झाले. त्यानंतर त्यांचा शोध घेत असताना कंडारेचा शोध लागला आणि त्याला अटक केली. मात्र आमदार पटेल पसार झाले. त्यांचं लोकेशन इंदोर येथे आल्यानंतर पथक त्याही ठिकाणी गेले होते. मात्र तेथून ते कारने पसार झाले. त्यानंतर त्यांचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. आमदार पटेल यांच नाव समोर आल्याने मात्र जळगावसह राज्यात खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यातील आणखी काही दिग्गज राजकारणी BHR घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती समोर आलेली आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला जितेंद्र कंडारे हा पकडला गेल्याने तो आता पोलिस चौकशीत तोंड उघडू लागल्याने अनेक दिग्गजांची धाकधूक वाढलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.