राज्य-देश

गडचिरोली जिल्ह्यातील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळालेले असून पोलिसांचे सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झालेली आहे. या चकमकित दहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलात ही चकमक झालेली आहे. मागील महिन्यात या भागात झालेल्या मोठ्या नक्षली हल्ल्यात 22 जवान शहिद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांचे सी-60 पथकाचे कमांडो जवान या भागात नक्षल विरोधी अभियान राबवित होते.
या भागात कसनसुर नक्षल दल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलांना प्राप्त झालेली होती.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.