क्राईम
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू

दि-01/09/2020 जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या विरवाडे येथील गणपती विसर्जन करिता गेलेल्या तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू .
मृतांमध्ये दोन सख्खे व एक चुलत अशा तीन भावांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तीन तरुणांचा गुळ नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. मृतांमध्ये दोन सख्खे चुलत अशा तीन भावांचा समावेश आहे.
सुमित भरत सिंह राजपूत वय (30) कुणाल भरत सिंह राजपूतवय (18) व ऋषिकेश रजेसिंग राजपूत (22) असे मृत तरुणांची नावे आहेत. सदर घटनेने विरवाडे गावावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेची चोपडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.