वृत्तविशेष

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटर सपोर्टवर असल्याची डॉक्टरांची माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलेली आहे. लता मंगेशकर काही दिवसांपूर्वी कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढून डिस्चार्ज देण्यांत आला होता.

आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलेली आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे, अशी माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिलेली आहे.डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत.तसेच लता त्यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्ट लावण्यात आलेला असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती डॉ प्रतीत समदानी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. एएनआयनं यासंदर्भात ट्विट केलेलं आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.