आंतरराष्ट्रीयठाणेपुणेमुंबईरंजक माहितीवृत्तविशेष

गुगल,विकिपीडियावर एकनाथ शिंदेंची हवा ! सर्च मध्ये बायडेन,पुतीन व मोदींनाही खूप टाकले मागे

गुगल,विकिपीडियावर एकनाथ शिंदेंची हवा ! सर्च मध्ये बायडेन,पुतीन व मोदींनाही खूप टाकले मागे

Eknath shinde | एकनाथ शिंदे नावाच्या वादळानं केलेल्या बंडामुळे एकनाथ शिंदे हे नाव देशातच नव्हे तर आता साता समुद्रापार जगाचे लक्ष वेधून घेत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाला सध्या जगभरातून इंटरनेटवर सर्च केले जात असून, एकनाथ शिंदे (Eknath shinde ) हे नेमके कोण आहेत ? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये आहे.यात सर्वात विशेष बाब म्हणजे विकिपीडियावर एकनाथ शिंदे हे सध्या , बायडेन,मोदी आणी पुतीन या प्रसिद्ध आणी ताकदवर नेत्यांपेक्षाही जास्त प्रसिद्ध होत आहे.काही दिवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक 50 पेक्षा जास्त आमदारांसह गुवाहाटी येथे डेरा टाकल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झालेलं आहे.

Source: wikipedia
Source :wikipedia


विकिपीडिया हा जगात सर्वात जास्त वापरला जाणारा मोफत विश्वकोश आहे.जगातील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया हा आता परवलीचा शब्द निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद हे गूगल नंतर विकिपीडियावर देखील दिसत आहेत. जो बायडन यांच्या बद्दलचा विकिपीडियाचा लेख हा 1,27,104 लोकांकडून वाचला गेला तर एकनाथ शिंदे यांचा लेख तब्बल 3,35,060 लोकांनी वाचला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे विकिपीडिया आर्टिकल सध्या जगात राजकीय क्षेत्रात सर्वात जास्त वाचले जात असल्याची माहिती विकिपीडियाचे भारतातील संचालक अभिषेक सूर्यवंशी यांनी दिलेली आहे.
Eknath Shinde, Who exactly is Eknath Shinde?
एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत ? अशा पद्धतीने गुगल व विकिपीडिया वर सर्च केले जात आहे.याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जगभरातील नागरिक एकनाथ शिंदेंबाबत विकिपीडियावरून माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.विकिपीडियावर सध्या एकनाथ शिंदे हे अव्वल स्थानी आहे. एकनाथ शिंदेनंतर अनुक्रमे अमेरीकेचे राष्ट्रपती जो बायडन, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमाक लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख 67,848 लोकांनी वाचलेला आहे.
जगातील 33 देशांमध्ये तीन दिवसांत पाच नेत्यांविषयीची माहिती गुगल आणी विकीपिडीयावर सर्वाधिक सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे हे सर्वात पुढे हाते.एकनाथ शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्या देशांमध्ये मलेशिया 61%,जपान 59%, कॅनडा 55% , पाकिस्तान 54 %, सौदी अरेबिया 57 %, नेपाळ 51 %, बांगलादेश 42 %, थायलंड 54 % लोकांनी सर्च केलेलं आहे. दरम्यान भारतात एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे ? याबाबत देखील खूप जास्त प्रमाणात सर्च केलं जात आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.