राजकीय

गुळ नदीवरील धोकादायक पुलाची दुरूस्ती होणार

चोपडा – बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील चोपड्या जवळील क्र.१४२/०० मधील गुळ नदीवरील धोकादायक पुलाची दुरुस्ती करणे बाबत चोपड्याच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी दि-27/08/2020 रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांना पुलाच्या दुरूस्ती करणेबाबत पत्र दिले होते.या पत्राची मुख्य अभियंता नाशिक यांनी तात्काळ दखल घेत या पुलाच्या दुरूस्तीसाठी 100 लक्ष रू मंजूर केलेले असून सदरील पुलाचे तात्काळ संपूर्ण स्ट्रक्चरल आॕडिट करूनच काम हाती घ्यावे.तसेच सन 2020-21 मध्ये शासनाकडून या पुल दुरूस्ती करिता पुरेसे अनुदान उपलब्ध झाल्याशिवाय कामे सुरू करू नये असे आदेश अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांना देण्यात आलेले आहेत.
सदर पुलाचा खालचा भाग दगडी बांधकामातील असुन वरील भाग आर.सी.सी.स्ट्रक्चरचा आहे. सदर पुल ९१ मीटर लांबीचा असून त्यात १० मोटरचे ८ गाळे आहे.सदर पुलाची उंची ९ मीटर इतकी आहे.तथापी सदर पुलाच्या चोपडयाकडून पाचव्या तसेच धानो-याकडून चोथ्या क्रमांकाच्या गाळयातील गर्डरचे नोक तुटलेल्या आहेत. त्यामुळे अवजड वाहन पुलावरुन जातांना मोठ्या प्रमाणात कंपन जाणवत होते. सदर बाब वाहतुकीचे दुष्टीने अतिशय गंभीर होती. या बाबीचा विचार करता पुलांचे तिन गाळयांची पुर्नबांधणी व इक्सपान्शन जॉईंटची दुरुस्ती करणे व पायाचे संरक्षण करणे
अत्यावश्यक होते.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.