राजकीय
गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांचा पोलिसांसह जनतेसाठी खास संदेश
मुंबई – महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नवीन वर्षाचे स्वागत केले. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच नवीन वर्षाच्या स्वागतावेळी राज्यात अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचेही अभिनंदन करतो.असे जाहीर कौतुक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केलेले आहे.