आरोग्य

गॅस सिलेंडरने भरलेला आयशर ट्रक उलटला, सिलेंडर आले रस्त्यावर

नाशिक दि-4 : शहरातील पेठ मार्गावरील कोटंबी गावाजवळ गॅस सिलेंडरने भरलेला आयशर ट्रक पलटी झाल्यामुळे ट्रकमधील गॅसच्या टाक्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या. या विचित्र अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेले आहे.

याबाबत याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक-पेठ मार्गावरील कोटंबी गावाजवळच्या हॉटेल कसारा जवळील वळणावर नाशिककडून गुजरातकडे जाणारा आयशर ट्रक (क्रमांक MH15 HH 3259) भररस्त्यात पलटी झाला. त्यानंतर आयशरमधील इण्डेन कंपनीच्या नवीन गॅसच्या टाक्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या. त्याचवेळी औषधी पुरवठा करणारे युनिव्हर्सल कंपनीचे सेल्समन वैभव पुजारी रा.पंचवटी, नाशिक हे दुचाकीवरून नाशिककडे जात असताना त्यांच्या मोटर सायकलवरच टाक्या आदळल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली, मात्र सुदैवाने प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले.तसेंच आणखी दोन जण अक्षरशः टाक्यांखाली दाबले गेलेले होते. स्थानिक ग्रामस्थांनी व इतर वाहनचालकांनी टाक्या बाजूला करून त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जवळील पेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेलं आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.