राजकीय

गोडसेने गांधींचा “वध” केला; नाना पटोलेंच खळबळजनक विधान

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आपल्या खळबळजनक विधानांमुळे वादात सापडलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलंय. आज महात्मा गांधींबाबत बोलताना नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा वध केला असं धक्कादायक विधान केल्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण हत्येऐवजी वध या शब्दावर अनेकांनी आता आक्षेप घ्यायला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केल्याने भाजपने अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीही दिलेल्या आहेत, तसेच दोन दिवसांपूर्वीच भाजपने नाना पटोलेंच्या घरी मनोरुग्णाचे औषध पाठवलं होत.मात्र गोडसेच्या मते गांधींचा वध झाला, अशा अर्थाने मी ते वाक्य बोललो होतो, असे स्पष्टीकरणही नाना पटोलेंनी भाषणानंंतर माध्यमांना दिलेलं आहे.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नावाच्या आतंकवाद्याने वध केला. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत व त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहतील. गांधी विचार देशाने तसेच जगाने स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. हा देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचारानेच चालेल, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
गांधीजींची अहिंसेची शिकवण जगाने स्विकारलेली आहे. गांधी एक व्यक्ती नसून तो विचार आहे तो विचारच देशाला तारणारा आहे. ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केल्यानंतर मिळालेले हे स्वातंत्र्य आज धोक्यात आल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे त्यामुळे स्वातंत्र व संविधान अबाधित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल खोटा इतिहास सांगून त्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अपप्रचार थोपवण्यासाठी सजग रहा, सतर्क रहा. स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणे गांधी विचाराची लढाई सुरु ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी केले. मात्र हे बोलताना वध हा शब्द वापरल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.