“गोल्ड सिटी” हाॕस्पीटलने आकारलेले जादा बिल परत करण्याचे आदेश

दि-11/09/2020 जळगाव येथील गोल्ड सिटी हॉस्पिटलने तक्रारदाराचे नातेवाईक असलेल्या कोरोनाबाधीत रूग्णाच्या उपचाराचे दि-20 जुलै रोजी 1,90,000 रूपयांचे एकूण बिल काढलेले होते. या एकूण बिलात डाॕक्टरांनी या रूग्णाला तपासणी करताना पीपीई किट साठी आकारलेले 49,500 रूपयांचे अवाजवी बिल रूग्णाला परत करण्याचे आदेश आज जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर covid-19 जळगाव यांनी गोल्ड सिटी हाॕस्पीटलला दिल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे.यामुळे या खाजगी रूग्णालया मार्फत रूग्णांची बेसुमार लूट होत असल्याचे अधोरेखीत झालेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चंद्रशेखर देविदास अत्तरदे यांनी दिलेल्या यांचे नातेवाईक असलेल्या महिलेला जळगाव येथील गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये 11जुलै 2020 रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तेव्हा पासून त्यांच्यावर सलग 10 दिवस उपचारा दरम्यान डॉक्टरांनी 20 वेळा रूग्णाला तपासणीसाठी व्हिजीट दिलेली असून प्रत्येक वेळी डाॕक्टरांनी एक नग 2000 रू किंमतीचे याप्रमाणे प्रत्येक वेळी नवीन पीपीई किट घालून तपासणी केल्याचे दाखविलेले आहे. त्याचप्रमाणे डाॕक्टरांची व्हिजीट फि म्हणून 3,000/रू याप्रमाणे 20 वेळा व्हिजीटचे 60,000/रूपये एकूण बिलात आकारलेले होते.या अवाजवी बिलासंदर्भात अत्तरदे यांनी मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्री, आणि जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे लेखी तक्रार केलेली होती.त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर असे निदर्शनास आले कि रूग्णाकडून पीपीई किट आणि डाॕक्टरांची व्हिजीट यामध्ये 49,500रू बिल जादा आकारले गेलेले आहे. ते जादा आकारलेले बिल रूग्णाला परत आदेश आज जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांनी गोल्ड सिटी हाॕस्पीटल जळगाव यांना दिलेले आहे.यामुळे कोरोनाच्या कठीण काळात खाजगी रूग्णालयाकडून रूग्णांची होणारी बेसुमार लूट समोर आलेली आहे.असे प्रकार जिल्ह्यात आणखी कुठे चालू आहेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.
टिप- गोपनीयतेच्या कारणाने पुरावे राखून ठेवण्यात आलेले आहे.