क्राईमराजकीय

गौणखनिज घोटाळ्याप्रकरणी कारवाईसाठी जि.प.सदस्या पल्लवी सावकारेंचे पोलिस अधिक्षकांना निवेदन

जळगाव- जिल्ह्यातील जि.प.लघुसिंचन विभागात बांधकाम कंत्राटदारांकडून जमा करण्यात आलेल्या गौणखनिज वाहतूक परवान्याची चौकशी करण्याची मागणी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली होती. यात रॉयल्टीच्या पावत्यांमध्ये एकच वाहनचालक अनेक गाड्यांवर एकाच तारखेला एकाच वेळी दिसत आहे.बऱ्याच वाहनांची आरटीओकडून माहिती घेतली असता काही दोन चाकी तर काही तीन चाकी अशा वाहनांवरून दोन ते तीन ब्रास वाळू वाहतूक झाल्याचे दिसत आहे. तसेच अनेक कामांवर तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाकडून गौण खनिज वाहतुकीसाठी देण्यात येणाऱ्या परवान्याप्रमाणे ठेकेदाराने हुबेहूब बनावट परवाने आणि राजमुद्रेचे बनावट शिक्के मारून लघुसिंचन विभागाकडे दिलेले आहे. यातून कोट्यवधींचा रॉयल्टी बुडविण्यात आल्याचे दिसून आलेले आहे.
याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवीताई सावकारे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना सविस्तर माहिती व पुराव्याच्या आधारे दि-२८/०९/२०२० व दि-१२/१०/२०२० रोजी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सदरील तक्रार अर्जामध्ये सिंचन विभाग जि.प.जळगांव यांच्यामार्फत जलयुक्त शिवार, जलसंधारण विभाग व इतर योजनांमध्ये सन २०१४-२०२० या कालावधीमध्ये गौणखनिज रॉयल्टी रक्कम व त्यासाठी बनावट गौणखनिज परवाने, कागदपत्रे तयार करून, बेकायदेशीर राजमुद्रेचा गैरवापर करून कोट्यवधी रूपयांचा भष्ट्राचार जि.प.जळगांव यांच्या कार्यालयातील संबंधीत विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत व कटकारस्थान करून भष्ट्राचार केलेला आहे. सदरील तक्रारीबाबत जिल्हाधिकारी यांनी दि- ०३/११/२०२० रोजी सुनावणी घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधीतावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.परंतु अद्यापपावेतो कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे यांचेकडे चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या भ्रष्टाचाराची व्याप्ती करोडोंच्या घरात असल्याने सदरचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करावा अशी मागणी केलेली आहे. अन्यथा मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका व रीट याचिका दाखल करावी लागेल.असे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे.याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडून सविस्तर माहिती घेऊन कारवाई केली जाईल असे आश्वासन जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे यांनी दिलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.