ग्राहक कल्याण फाऊंडेशनची भुसावळ कार्यकारिणी जाहीर

भुसावळ –
ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या भुसावळ विभागामध्ये नुतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आलेली असून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. स्थानिक विठ्ठल मंदीर वार्ड येथील ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या कार्यालयात रविवार रोजी आयोजित बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.
राज्य संरक्षण परिषद सदस्य विकास महाजन, राज्य समन्वयक राजेश सैनी यांच्या आदेशान्वये तर जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, जिल्हा सचिव अॅड. जास्वंदी भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या तालुकाध्यक्ष उज्वला बागुल यांच्या अध्यक्षेतेखाली आयोजित बैठकीत नवीन पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष उज्वला बागुल, सचिव डॉ. नितीन यावलकर, उपाध्यक्ष हर्षल गोराडकर, सहसचिव किशोर ब-हाटे, कार्याध्यक्ष राजश्री नेवे, सह कार्याध्यक्ष अजय रायकवार, कोषाध्यक्ष ॲड.निलेश भंडारी,सहकोषाध्यक्ष विवेक सैनी, जनसंपर्क प्रमुख डॉ. जगदीश पाटील, सहजनसंपर्क प्रमुख प्रदीप बावस्कर, प्रसिध्दी प्रमुख प्रेम परदेशी, तालुका कार्यालय प्रमुख मंदार बागुल, सल्लागार अॅड. जयश्री देशमुख , ॲड. विक्रम शेळके,कमलाकर महाजन, डॉ.लीलाधर भोळे यांचा समावेश आहे.