कृषिपोलिस प्रशासन

घरफोडीतील गुन्हेगारांची SDPO श्री वाघचौरे यांनी घेतली ओळख परेड

भुसावळ- उपविभागातील संभाव्य घरफोडी,चोरी यासारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून आज रोजी भुसावळ उपविभागातील पोलीस स्टेशन्सला यापूर्वी घरफोडीचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींची अर्थात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख परेड आज रोजी दुपारी 12.30 ते 2.30 या दरम्यान घेण्यात आली.

या ओळख परेडमध्ये उपविभागातील भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील 7आरोपी,बाजारपेठ पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील 7 आरोपी व भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील 7 आरोपी याप्रमाणे एकूण 21रेकॉर्डवरील आरोपी बोलावण्यात आले होते. ओळख परेड दरम्यान त्यांना सविस्तर विचारपूस करण्यात आली त्याशिवाय सद्यस्थितीमध्ये सदरचे आरोपी काय करतात? कोणते वाहन वापरतात? कोणता मोबाईल वापरतात? आदी बाबींची सविस्तर माहिती नोंदविण्यात आली तसेच त्यांचे इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले.

त्यांना चांगल्या वर्तनाची समज देण्यात आली.याशिवाय त्यांचेवर सीआरपीसी 110 खाली प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले असून सदरची कारवाई त्यांच्यावर करून घेण्यात येत आहे.

सदरची ओळख परेड कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत बाजारपेठ पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक ठोंबे भुसावळ शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक कुंभार भुसावळ तालुका पोलीस स्टेशन व तीनही पोलीस स्टेशन यांच्या गुन्हे शाखेतील अंमलदार यांनी केलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.