राजकीय

चक्क नाशिक कारागृहातून निवडणूक लढवून तो”पठ्ठा” जिंकलाही

रावेर – रावेर शहरात वारंवार दंगलीच्या गुन्ह्यात समावेश आढळून आलेल्या पाच दंगलखोर गुन्हेगारांवर 19 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली होती.या सर्वांना नाशिक कारागृहात स्थानबध्द करण्यात आलेले आहे.यापैकी स्वप्नील मनोहर पाटील रा. बक्षिपूर ता. रावेर या तरूणाने चक्क नाशिक कारागृहातूनच ग्राम पंचायतीची निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळविलेला आहे. एमपीडीए कायद्या नुसार नाशिक मध्यवर्ती कारागृहात असलेल्या स्वप्नील मनोहर पाटील या तरूणाने बक्षिपूर ग्राम पंचायत निवडणूकीत 291 मते मिळवून सर्वात अनपेक्षित व धक्कादायकरीत्या विजयी झालेला आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या प्रतिस्पर्धी उमेद्वाराचा दारुण पराभव केलेला आहे. 19 सप्टेंबर पासून म्हणजेच मागील पाच महिन्यांपासून तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे.नाशिक कारागृहात असताना स्वप्नील पाटील याने बक्षिपूर ग्राम पंचायतीची निवडणूक लढविलेली आहे. त्याच्या विरोधात पराभूत झालेल्या प्रतिस्पर्धी उमेद्वाराला अवघी 77 मते मिळालेली आहे. त्यामुळे स्वप्निलने एकतर्फी आणि दणदणीत विजय संपादन केलेला आहे. एकीकडे ग्राम पंचायत निवडणूकीत जळगाव जिल्ह्यात अनेक दिग्गज राजकीय नेते पराभूत झालेले असताना चक्क नाशिक मध्यवर्ती कारागृहातून रावेर तालुक्यातील बक्षिपूर ग्राम पंचायतीची निवडणूक लढवून या तरूणाने मिळविलेला विजय हा अलीकडच्या काळातील दुर्मिळ आणि तेवढीच आश्चर्यकारक घटना असल्याने जिल्हाभर चर्चेचा विषय बनलेला आहे .

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.