आंतरराष्ट्रीय

चक्क समुद्राला आग लागल्याचा दुर्मिळ व्हिडिओ प्रचंड व्हायरल

नवीदिल्ली – सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क समुद्रातील पाण्याला आग लागल्याचं दुर्मिळ दृष्य पाहायला मिळतंय. समुद्राच्या पाण्याला आग लागलेली असून आणि त्याला विझवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
खरे तर पाण्याला आग लागणे किंवा पाणी आणि आग एकत्र दिसणे दुर्मिळच आहे. म्हणून हा व्हिडिओ पाहणाऱ्या हजारो लोकांना या आगीवर विश्वासच बसलेला नाही, पण हा व्हिडिओ खरा आहे. सदरील व्हिडिओ हा मॅक्सिकोच्या समुद्रात आग लागल्याचा हा व्हायरल व्हिडिओ आहे.

गॅसगळतीमुळे लाव्हा पेटला
प्रथम पाहणाऱ्या हर एक व्यक्तीला अचंबित करून टाकणारा हा व्हिडिओ मॅक्सिकोच्या युकाटनमधील आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती. समुद्राच्या पृष्ठभागावर वितळणारा लाव्हा पाहायला मिळाला. दूर-दूर पसरलेल्या समुद्रामध्ये एक नारंगी रंगाचा मोठा गोल दिसत आहे. ज्यातून आगीच्या ज्वाळा येताना दिसत आहेत. समुद्राच्या आतील पाईपलाईनमध्ये गॅस लीक झाल्याने ही आग लागली असल्याचं मेक्सिको कडून जाहीर करण्यात आलेल आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.