आरोग्य

चार जणांची हत्या,जळगावातून पाच जणांना अटक

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ गुरूवारी चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती. त्या घटनास्थळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला एक एटिएम कार्ड मिळून आल्याने तपासाची चक्रे फिरविल्यानंतर ते एटिएम कार्ड जळगावचे असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जळगाव शहरातील पाच संशयीतांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडालेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील काही जणांनी जळगावच्या हरिविठ्ठल नगरातील काही जणांना कोट्यवधी रूपयांचे सोने स्वस्तात देण्याचे आमीष दाखविले होते.यावेळी जळगावच्या संशयीतांनी नगर सोने खरेदीसाठी येथे जाताना सोबत हत्यारे देखील घेतलेली होती. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ गुरूवारी सायंकाळी त्यांची भेट झाली. याप्रसंगी समोरच्यांनी जळगावच्या लोकांना बनावट सोने देऊन त्यांच्या कडील पैशांची बॅग घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत जळगावच्या लोकांनी आपल्याकडील हत्यारांनी वार करत त्या चौघांची निर्घृण हत्या केली. या हाणामारीत सुरेगाव येथील नातीक कुंजीलाल चव्हाण (40), नागेश कुंजीलाल चव्हाण (16), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (35) आणि देऊळगाव सिद्धी येथील लिंब्या हव्या काळे (22) यांचा खून झाला. या हत्याकांडामुळे राज्यभर प्रचंड खळबळ उडालेली होती. दरम्यान, नगरच्या पोलीस पथकांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांना घटनास्थळी ओळखपत्र आणि एटीएम कार्ड मिळाले. यावरून या प्रकरणाचे धागेदोरे हे जळगावपर्यंत पोहचले असल्याचे लक्षात आले. या अनुषंगाने नगरचे पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना याबाबत कळविले असता , त्यांनी लागलीच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक बापू रोहम यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने कसून तपास करत जळगावातील हरीविठ्ठल नगरातील नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे (वय 22) कल्पना किशोर सपकाळे (वय 40) आशाबाई जगदीश सोनवणे (वय 42) प्रेमराज रमेश पाटील (वय 22) आणि योगेश मोहन ठाकूर (वय 22) अशा या पाच संशयितांना अटक करण्यात आलेली असून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.पुढील तपास नगर एलसीबीचे पथक करीत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.