चालू बसचे स्टेअरींग लाॕक, चालकाने प्रसंगावधान राखत 45 प्रवाशांचे प्राण वाचविले

बोदवड -तालुक्यातील सुरवाडे गावा जवळ धावणाऱ्या एसटी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले .मात्र या कठीण प्रसंगी बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बस मधील ४५ प्रवाशांचे प्राण वाचवले.ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव बोदवड बस क्रमांक एम.एच. २० बी. एल. १५९६ घेऊन बस चालक जगदीश देवचंद लोखंडे वय ३७ येथून जळगावला जाण्यासाठी निघालेले होते. सुरवाडे मार्गे जात असताना सुरवाडे खुर्द येथे प्रवाशांना उतरवण्यासाठी बसचा वेग कमी करण्यासाठी गाडीचा ब्रेक दाबला असता अचानक बसचे स्टेअरिंग लॉक झाले, रिमझिम पाऊस सुरू असल्याने ब्रेक दाबताच गाडी अचानक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर धडकली .त्यामुळे बसच्या दर्शनी भागाचे काच फुटून नुकसान झाले. मात्र यात बस चालकाने मोठे प्रसंगावधान दाखवल्याने ४५ प्रवाशांपैकी कुणीही जखमी झाले नाही. परंतु एसटी बसचे अंदाजे २५ हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे. दरम्यान या अपघाताची खबर स्वतः बसचालक जगदीश लोखंडे यांनी बोदवड पोलिस ठाण्यात दिली. सुदैवाने या अचानक घडलेल्या अपघातात जीवितहानी टळल्याने बस मधील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या काहींना खरचटले आहे. मात्र त्यांनी बस चालक जगदिश लोखंडे यांच्या प्रसंगावधानचे कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले.