मनोरंजनराष्ट्रीय

चित्रपटांपेक्षा लघुपट बनवणे जास्त कठीण: इंदिरा धर मुखर्जी

 

चित्रपट बनवण्यापेक्षा प्रभावी लघुपट बनवणे कठीण आहे, असे मत ‘सोच’ या लघुपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शक इंदिरा धर मुखर्जी यांनी व्यक्त केले. “लघुपटांमध्ये आपल्याला अत्यंत मर्यादित वेळेत संदेश द्यायचा असतो सांगावा लागतो आणि लोकांना चित्रपटाचा आनंद लुटता येईल याप्रकारे त्यावर संस्कार करावे लागतात.  कथा सगळीकडे सारखीच आहे. कथेवर केलेल्या संस्कारतूनच दिग्दर्शक बदल घडवू शकतो, असेही त्या म्हणाल्या.

  

या चित्रपटाच्या अभिनेत्री आणि निर्मात्या जया सील घोष यांच्याबरोबर 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित #MIFFDialogues मध्ये इंदिरा धर मुखर्जी बोलत होत्या.

‘सोच’ हा घरगुती हिंसाचारावरील चित्रपट असला तरी त्यात मानसिक आरोग्याचा कोनही जोडला गेला आहे असे इंदिरा धर मुखर्जी यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. प्रत्येकाने स्वतःची आवड कधीही सोडू नये. “तुम्ही तुमची आवड जोपासली नाही, तर तुम्ही जीवनात आनंदी होणार नाहीत. तुम्ही  आयुष्याशी तडजोड कराल”, असे त्या  म्हणाल्या.

कमी लांबीचा असो वा पूर्ण लांबीचा चित्रपट निर्मिती सारखीच असते असे निर्मात्या आणि अभिनेत्री जया सील घोष यांनी सांगितले. “सोच माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण चित्रपटातील नायक एक नृत्यांगना आहे. नृत्यांगना असल्याने, मी एका नर्तिकेचे जीवन आणि ती अत्यंत वेदनादायी प्रवासातून कशी जाते याचा शोध घेतला, असे घोष यांनी सांगितले.

चित्रपटाच्या मागणी बरहुकूम साजेसे संगीत दिल्याबद्दल जया सील घोष यांनी त्यांचे पती विक्रम घोष यांचेही आभार मानले.

चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती

‘सोच’ हा भारतातील लैंगिक असमानतेवर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. आपल्या देशात कौटुंबिक हिंसाचार आणि अत्याचार हा चिंतेचा विषय आहे आणि विवाहित महिला त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. हा चित्रपट मानसिक आरोग्यावर देखील भाष्य करतो.

दिग्दर्शकाबद्दल 

इंदिरा धर मुखर्जी या भारतीय दिग्दर्शक, लेखिका, अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत. द ग्रीन विंडो या त्यांच्या सर्वात नव्या लघुपटाला अनेक लघुपट महोत्सवांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.