क्राईम

चोपड्याच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द,

चोपडा विधानसभा मतदार संघ (१०) मध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढवली होती. यावेळी सौ सोनवणे आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. निवडणुकीनंतर पराभूत उमेद्वार तथा माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाने जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयाने या खटल्याचा निकाल दि- ०४/११/२०२० रोजी दिलेला असून जात पडताळणी समितीने आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे नामनिर्देशन पत्रा सोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाण पत्र रद्दबात्तल ठरवले आहे. या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सन-२०१९ मध्ये चोपडा विधानसभा मतदार संघ-(१०) अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी अनुक्रमे १)सौ लताताई चंद्रकांत सोनवणे (शिवसेना), २) जगदीशचंद्र रमेश वळवी (राष्ट्रवादी), ३) प्रभाकर गोटू सोनवणे,(अपक्ष) ४) सौ माधुरी किशोर पाटील(अपक्ष) ५) डॉ चंद्रकांत जामसिंग बारेला(अपक्ष), या प्रमुख उमेद्वारांमध्ये चुरशीची लढत झाली होती. निवडणुकीत शिवसेनेच्या उमेद्वार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे या निवडून आलेल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र रमेश वळवी यांना मिळाली होती. निवडणुकी नंतर पराभूत उमेदवार तथा माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या टोकरे कोळीच्या जात प्रमाण पत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिलेले होते. सदर खटल्याची सुनावणी होऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाने जात पडताळणी समिती नंदुरबार येथे त्या खटल्याचा निकाल दि-४/११/२०२० रोजी लागला असून जात पडताळणी समितीने आमदार सौ लता ताई चंद्रकांत सोनवणे यांचे नाम निर्देशन पत्रा सोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाण पत्र रद्द बात्तल ठरवले आहे.तसेच आमदार सौ लताताई सोनवणे यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी जळगाव महानगर पालिका निवडणुकीत अनुसूचित जमाती या राखीव जागेसाठी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सौ सोनवणे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र देखील नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे. तसेच अर्जदार यांनी मूळ जमातीचे प्रमाणपत्र जप्त करण्यासाठी आदेश प्राप्त झाल्या पासून आठ दिवसांच्या आत नंदुरबार येथील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जमा करण्याचे आदेश दि-४/११/२०२० रोजी निर्गमित केले आहेत. समितीने जळगाव महानगर पालिका निवडणुकीत अर्जदार सौ लताताई सोनवणे यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातुन निवडणूक लढवली असल्यामुळे तसेच अनुसूचित जमातीच्या प्रमाण पत्राच्या आधारे देय नसलेला लाभ मिळवलेला असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग
( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पळताळणीचे विनियमन ) अधिनियम,२०००च्या कलम-१० व ११ अन्वये उचित कारवाई करण्यात यावी व केलेली कारवाई जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयास अवगत करावी असे देखील आदेशात म्हटले आहे.
चोपडा विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्राविरुद्ध माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी जात पळताळणी समिती नंदुरबार कार्यालया कडे केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन अखेर समितीने आमदार सौ.लताताई सोनवणे
यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र सिद्ध न झाल्याने रद्द ठरविण्याचे आदेश दिलेले आहेत.
या धक्कादायक निकालामुळे त्यांच्या आमदारकीचे काय ?
अशी चर्चा चोपडा मतदारसंघासह जिल्ह्यात सुरू झालेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.